Karan Johar करण जोहरचा ट्विटरला ‘गुडबाय’, नेटकरी म्हणाले आधी ‘हा’ कचरा हटव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता करण जोहर याने ट्विटरला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर एक ट्विट करत त्याने ही माहिती दिली आहे. आयुष्यात सकारात्मक ऊर्जा हवी आणि त्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे म्हणत करणने ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच्या या निर्णयानंतर तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

करण जोहर आणि ट्रोलिंगहे जुने समिकरण आहे. वादग्रस्त विधाने, झंकीपंकी कपडे आणि नेपोटिझममुळे करण ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. या ट्रोलिंगलाच कंटाळून त्याने ट्विटरला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याचे बोललो जात आहे.

सोमवारी दुपारी तीन वाजता करण जोहर याने एक ट्विट केले. ‘आयुष्यात सकारात्मक ऊर्जा हवी आणि त्या दिशेने हे पहिले पाऊल. गुडबाय ट्विटर’, असे या ट्विटमध्ये त्याने म्हटले. करणच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनीही रिप्लाय दिला. अनेकांनी त्याला कॉफी विद करणचा कचरा नेटवरून साफ करण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी शाहरूख खानशिवाय तुझी कोणी आठवण काढणार नाही असेही म्हटले आहे.

Image

दरम्यान, नुकताच करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ च्या सिझन 7 चा शेवटचा भाग प्रसारित झाला. या सिझनमध्ये करणने मान्य केले की त्याला या ट्रोलिंगची आता सवय झाली आहे. तरी करण जोहरने आज ट्विटरला कायमचा रामराम केल्याने त्याचे चाहते मात्र निराश झाले. मात्र काहींनी त्याला ट्रोलही केले.