Karnataka Accident – यादगिरीमध्ये कार आणि बसची समोरासमोर धडक; अपघातात 6 जणांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या यादगिरी जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडली. धडक बसल्यानंतर कारने पेट घेतला. या आगीत कारमधील सहा जण होरपळले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्नीशमन दल आणि आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, कार यादगिरीहून रायचूरच्या दिशेने जात होती, तर बस बंगळुरूवरून कलबुर्गीकडे चालली होती. अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघातात कारमधील सर्वांचा मृत्यू झाला तर बसमधील काही प्रवाशांना किरकोळ जखम झाली. अपघातात बसच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. आपत्कालीन पथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे.