कावेरी पाणी प्रश्न पेटला! कर्नाटक बंदचा विमानांच्या उड्डाणांवर परिणाम; 44 उड्डाणे रद्द, विमानतळावर गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
karnatak-bandh-airport

कावेरी नदीचे पाणी शेजारच्या तमिळनाडूला सोडल्याच्या निषेधार्थ कन्नड संघटनांच्या छत्री संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये शुक्रवारी बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 44 उड्डाणं रद्द करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं की, ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणं रद्द करण्यात आली आणि प्रवाशांना वेळेत याची माहिती देण्यात आली.

मात्र, कर्नाटक बंदच्या प्रभावामुळे अनेक प्रवाशांनी तिकिटं रद्द केल्यामुळे प्रवासी संख्या घटली आणि विमानं रद्द करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, पाच कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी विमानतळ परिसरात आंदोलन करण्यासाठी प्रवेश केल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं.