कुमारस्वामींचा देवाला सवाल ‘मला मुख्यमंत्री का बनवले’

69
kumaraswamy-assembly

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटमधील राजकीय नाट्य वाढत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी गुरुवारी विधानसभेत भाषण केले. तसेच शुक्रवारीही ते विधानसभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. या वेळी कुमारस्वामी भावुक झाले होते. आपल्याला अशा परिस्थितीत मुख्यमंत्री का बनवले असा सवाल आपण देवाला विचारत असतो असे कुमारस्वामी यांनी विधानसभेत सांगितले. भाजपशी वाद घालण्याची आपली इच्छा नाही. मात्र, भाजपशी वाद घालण्याची आज गरज आहे. तुम्ही मुख्यमंत्रीपदाची खर्ची बळकावू शकतात. त्यासाठी असे प्रकार करण्याची गरज काय असा सवालही त्यांनी भाजपला केला.

‘आपल्याला खुर्चीचा मोह नाही. तुम्ही आजही सरकार स्थापन करू शकता. सोमवारीही करू शकता. मात्र, भाजपला घाई झाल्याचे दिसून येत आहे. आपण सरकारस्थापनेसाठी निमंत्रण घेऊन कोणाकडेही गेलो नव्हतो. आता काँग्रेस आपल्याकडे आले होते. तर 2006 मध्ये भाजप सरकारस्थापनेसाठी आपल्याकडे आले होते. तो 12 वर्षापूर्वीचा आपण निर्णय अयोग्यही असू शकतो. आता काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या दिवसापासूनच सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

उत्तर कर्नाटकात 2009 मध्ये पूर आला होता. तेव्हा येदियुरप्पा संकटात सापडले होते. त्यावेळी अनेक आमदार रिसॉर्टमध्ये होते आणि येदियुरप्पा सरकार संकटात होते. त्या परिस्थिती येदियुरप्पा यांनी जे सहन केले, त्याच परिस्थितीतून आपण आता जात आहोत असे कुमारस्वामी म्हणाले. त्यावेळी आपल्याला पदावरून हटवू नये यासाठी येदियुरप्पांनी भाजपकडे विनंती केली होती. मात्र, आपले सरकार वाचवण्यासाठी आपण कोणासमोरही हात पसरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बहुमत सिद्ध करण्यापूर्वी कुमारस्वामी यांनी भाजपवर कडाडून टीका केली. तसेच भावुक होत आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या