
जनता दलचे (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवन्नाने व्हिसाशिवाय देश कसा सोडला? असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. डिप्लोमॅटिक पासपोर्टशिवाय देश सोडता येणे शक्य नाही. त्यामुळे रेवन्नाचा पासपोर्ट रद्द करून त्याला पुन्हा हिंदुस्थानात आणून सखोल चौकशी करावी, अशी विनंती कर्नाटक सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. प्रज्वल रेवन्नावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असून ते माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत.
रेवन्नाकडे जर्मनीचा व्हिसा नसताना त्याने देश कसा सोडला, तसेच तो जर्मनीत कसा पोहोचला? असे प्रश्न आता काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आले आहेत.
रेवन्नाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. त्यामुळे मोदी आणि भाजपवर टीका केली जात आहे. कर्नाटक सरकारने रेवन्नाविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. रेवन्नाविरुद्ध लैंगिक प्रकरणाचा तपास सुरू असताना तो देशाबाहेर कसा पडला? पंतप्रधान मोदी यांनी रेवन्नाचे राजनैतिक अधिकार रद्द करावेत, अशी विनंती कर्नाटक सरकारने केली आहे.



























































