
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अनुसया हॉटेलनजीक झालेल्या विचित्र अपघातात ट्रक चालक जखमी झाला. त्याच्यावर कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडला. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर हद्दीत घडलेल्या भीषण अपघाताची खबर ताजी असतानाच खेड तालुक्याच्या हद्दीत झालेल्या या विचित्र अपघातामुळे वर्षाचा शेवटचा दिवस अपघातवार म्हणून गणला गेला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसास मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या ट्रकचालकाने आपला ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला आणि तो चहा पिण्यासाठी रस्त्यापलीकडे असलेल्या अनुसया हॉटेलमध्ये गेला. दरम्यान रस्त्याच्या कडेला उभा केलेला ट्रक हळूहळू पुढे जाऊ लागला. चालकाच्या हे लक्ष्य आल्यानंतर त्याने तात्काळ पुन्हा ट्रककडे धाव घेतली. ट्रक चालक रास्ता ओलांडत असतानाच एक घाट उतरणारी कार समोर आल्याने तो गडबडला. या गडबडीत त्याचा एक पाय त्याच्यात ट्रकच्या टायर खाली गेल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर तो ट्रक घतरात कलंडला.
या आघातातात जखमी झालेल्या चालकाला तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आणि तिथून त्याला भरणे नका येथील एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
































































