
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफला मालदीवने आपले नवीन ग्लोबल ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन (एमएमपीआरसी) ने याची घोषणा केली. मालदीवसाठी हिंदुस्थान हे मोठे पर्यटकांचे केंद्रबिंदू आहे. कतरिना कैफला ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आल्याने याचा नक्कीच फायदा होईल, असे मालदीवला वाटते. गेल्यावर्षी भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये तणाव पाहायला मिळाला होता.