सेक्स डॉलला नवऱ्याने आणली कोंबडीच्या आकाराची सवत

जगात कोण काय करेल याचा नेम नाही. कोणी स्वत:शीच लग्न करतं, कोणी झाडाशी लग्न करतं तर कोणी बकरीशी लग्न करतं. कजाकिस्तानमधला एक बॉडीबिल्डर या सगळ्यांपेक्षा वेगळा निघाला आहे. त्याने सेक्स डॉलशी लग्न केलं होतं. या लग्नामुळे तो जगभर प्रसिद्ध झाला होता. त्याने या सेक्स डॉलचं मार्गो असं नावही ठेवलं होतं. तिच्यासोबत तो परदेशात फिरायला जातो, मसाज सेंटरमध्ये जातो आणि जेवायला हॉटेलमध्येही जातो. यासोबतच तो मार्गोसोबत योगा करतो आणि पार्ट्यांनाही जातो. युरी तोलोचको असं या बॉडीबिल्डरचं नाव असून त्याने आता मार्गोला सवत आणायचं ठरवलं आहे. ही सवत कोंबडीच्या आकाराची असल्याचं त्यानेच सांगितलं आहे.

युरीला सेक्स डॉल भयंकर आवडतात आणि अनेक सेक्स डॉलशी लग्न करण्याचा त्याचा मानस आहे. युरी आता कोंबडीच्या आकाराच्या सेक्स डॉलशी लग्न करणार असून त्याने तिचं नाव लोला ठेवलं आहे. आपल्या आयुष्यात लोला आली असली तरी मार्गोचं स्थान हे वरचं असेल असं युरीचं म्हणणं आहे. मार्गो ही माझी पहिली पत्नी असून तिचा मी कायम आदर करतो असं युरीने म्हटलं आहे. युरीने म्हटलंय की अनेक संस्कृती बहुपत्नीत्वाचा पुरस्कार करणाऱ्या आहेत, त्यानुसार मी देखील अनेक सेक्स डॉलशी लग्न करण्याचा विचार करत आहे. आपण हे सगळं प्रसिद्धीसाठी करत नसल्याचंही युरीचं म्हणणं आहे.

सेक्स डॉलशी लग्न करण्यापूर्वी युरीचं एका तरुणीवर प्रेम होतं. या तरुणीचंही त्याच्यावर प्रेम होतं. मात्र त्या तरुणीला आई बनायचं होतं. आपल्याला मूल नको असल्याने त्या तरुणीसोबतचे प्रेमसंबंध संपुष्टात आणले होते असं युरीने म्हटलंय. या तरुणीसोबतचे प्रेमसंबंध संपल्यानंतर युरीचे काही पुरुषांसोबतही संबंध आले होते. सेक्सडॉलसोबत लग्न करण्याच्या निर्णयाबाबत माझ्या घरच्या मंडळींनी कधीही आक्षेप घेतला नाही उलट मी खूश असल्याने त्यांनी ही बाब पटकन स्वीकारली असं युरीने म्हटलं आहे. वाईस नावाच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या