कोरोनाने घरातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या कुटुंबाला मिळणार पेन्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind_kejriwal

कोरोना संकटकाळात दिल्लीवासीयांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. त्यानुसार मोफत धान्य, कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि पेन्शन देण्यात येणार असल्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

कोरोना महामारीचा मोठा फटका दिल्लीला बसला आहे. त्यामुळे या संकटातून लोकांना सावरता यावे, लॉकडाऊनमध्ये त्याची आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून चालू महिन्यात तब्बल 72 लाख लोकांना प्रत्येकी पाच किलो धान्य मोफत देण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेतूनही पाच किलो मोफत धान्य मिळणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच एखाद्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांबरोबरच प्रती महिना अडीच हजार रुपये पेन्शन दिली जाणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.