
काँग्रेसचे केरळमधील अध्यक्ष मुलापल्ली रामचंद्रन यांनी बलात्कार झालेल्या महिलांबाबत अपमानजनक वक्तव्य केलं आहे. एका सभेदरम्यान त्यांनी बलात्कार झालेल्या महिलांना आत्मसन्मान असेल तर त्यांनी आत्महत्या करावी. असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
‘ज्या महिलेवर बलात्कार होतो, लैंगिक अत्याचार होतो. तिच्यावर कुणीच विश्वास नाही ठेवत.त्यामुळे जर त्या महिलेला आत्मसन्मान असेल तर तिने आत्महत्या करावी’, असे वादग्रस्त वक्तव्य रामचंद्रन यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी भाजपच्या महिला उमेदवार इमरती देवी यांना आयटम म्हटले होते. त्यानंतर खूपच गदारोळ झाला होता. त्यानंतर इमरती देवी यांनी कमलनाथ यांना लुच्छा, लफंगा व बेवडा म्हटले होते.
























































