
केरळमध्ये राहणाऱया एका व्यक्तीने अमेझॉनवरून आयफोन-12 मागवला होता. पण, डिलिव्हरी झाल्यानंतर त्या व्यक्तीला धक्का बसला. कारण पार्सल उघडल्यावर त्यात आयफोनऐवजी भांडी धुण्याचा साबण आणि पाच रुपयांचे नाणे मिळाले आहे. अलुवा येथील रहिवासी नूरुल अमीन यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. या संदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. नुरुल यांना जो फोन येणार होता. तो सप्टेंबरपासून झारखंडमधील कोणीतरी वापरत असल्याचे आयएमईआय नंबरवरून आढळून आले आहे.



























































