धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रेहाना फातिमाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । तिरूअनंतरपूरम

सबरीमाला मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेली सामजिक कार्यकर्ती रेहाना फातिमाला मंगळवारी अटक करण्यात आली. फेसबुकवर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकल्याचा आरोप तिच्यावर आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी तिने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. राधाकृष्ण मेनन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रेहानाविरोधात गुन्हा दाखल केला होता. रेहानाने फेसबुकबर टाकलेल्या पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मेनन यांनी केला होता. तिच्याविराधात पोलिसांनी कलम 295 ए नुसार(धार्मिक भावना दुखावल्याचा) गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

अटक टाळण्यासाठी तिने केरळ उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. मात्र, तिची याचिका फेटाळून लावत पोलीस या प्रकरणी आवश्यक ती कारवाई करू शकतात असे निर्देश न्यायलयाने दिले होते. 2014 मध्ये किस ऑफ लव आंदोलनात सहभागी झालेल्या रेहानाने एका महिलेसह 19 ऑक्टोबरला सबरीमला डोंगरावर दर्शनासाठी पोहचली होती. मात्र, भाविकांच्या विरोधामुळे तिला गाभाऱ्यात जाता आले नाही. आता धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिला अटक झाली आहे.