
सामना ऑनलाईन | लंडन
आपल्या आठव्या विम्बल्डन जेतेपदासाठी उत्सुक सेरेना विलियम्सला शनिवारी महिला एकेरी अंतिम लढतीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने पराभवाचा जोरदार धक्का दिला. कर्बरने फायनलमध्ये सेरेनाला ६-३ ,६-३ असे सहज पराभूत केले.कर्बरचे कारकिर्दीतील हे पहिलेच विम्बल्डन जेतेपद आहे. स्टेफी ग्राफनंतर विम्बल्डन ‘किताब पटकावणारी कर्बर ही पहिली जर्मन टेनिसपटू ठरली आहे .ग्राफने १९९६ मध्ये आपले शेवटचे विम्बल्डन जेतेपद पटकावले होते. आजच्या पराभवाने सेरेना मात्र आपल्या विक्रमी २४ व्या ग्रँडस्लॅम टेनिस अजिंक्यपदापासून वंचित राहिली आहे.





























































