खजाना महोत्सवात दिग्गजांची मांदियाळी, 22-23 ऑक्टोबरला ऑनलाइन मैफल

बहुप्रतीक्षित खजाना गझल महोत्सव विसाव्या वर्षात दिमाखात पदार्पण करीत आहे. यंदा हा महोत्सव 22 आणि 23 ऑक्टोबरला सायंकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. जगभरातील प्रेक्षक या ऑनलाइन मैफलीचा मोफत आनंद घेऊ शकणार आहेत. याद्वारे कर्करोग आणि थॅलेसेमिक रुग्णांसाठी निधी उभारण्यात येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या खजाना महोत्सवात दिग्गजांची मांदियाळी असणार आहे. त्यात पंकज उधास, अनुप जलोटा, तलत अझीझ, कविता सेठ, रेखा भारद्वाज, ओस्मान मीर, सुदीप बॅनर्जी, संजीवनी बेलांडे, जझीम शर्मा, मीनल जैन यांचा सहभाग असून प्रियंका बर्वे आणि सारंग कुलकर्णी हे विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. याचबरोबर खजाना कलाकार टॅलेंट हंटचे विजेते पुण्याचा भाविक राठोड आणि जबलपूरची प्रियंका सावरकर शिंदे यांचेही गायन होणार आहे. कॅन्सर पेशंट्स असोसिएशन आणि पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्टने गझल रसिकांना रुग्णांच्या मदतीसाठी उदात्तपणे मदतनिधी देण्याचे आवाहन केले आहे. ‘हंगामा’ या टीव्ही चॅनेल तसेच पंकज उधास यूटय़ूब आणि फेसबुक चॅनेलवर प्रेक्षक या गझल मैफलीचा आनंद घेऊ शकतील.