
सामना प्रतिनिधी । खालापूर
धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या खालापुरातील साजगाव येथे कार्तिकी एकादशीपासून बोंबल्या विठोबाच्या यात्रेला सुरुवात होणार आहे. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेला रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाकिक दरवर्षी भेट देतात. कोट्यवधींची उलाढाल होत असलेल्या या यात्रेत बैल बाजार, कपडे, भांडी, घोंगडी, मिठाई क सुक्या मासळीचा मोठा बाजार भरतो. मौत का कुँआ, उंच आकाश पाळणे यांच्यासह विविध मनोरंजनाचे अनेक प्रकार येथे पाहायला मिळतात.
एकादशीच्या आदल्या रात्री ताकई गावातून किठ्ठलाची पालखी निघून कीर्तन, भजन अशा धार्मिक कार्यक्रम होतात. गावातील तीन घराण्यांना सालाबादप्रमाणे पालखीचा मान दिला जातो. रात्री अडीच वाजता पालखी साजगाव मंदिरात पोहोचते. पहाटे 4 वाजता मूर्तीचा अभिषेक व महापूजेनंतर यात्रेस सुरुवात होते. किठ्ठल मंदिरात काकड आरती, भजन, कीर्तन, हरिपाठ अशा धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते.
































































