
हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. खलिस्तान समर्थकांनी जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हल्लेखोरांचा हा डाव उधळून लावत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी करत तिरंगा फाडण्याचाही प्रयत्न केला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून संताप व्यक्त केला जात आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ब्रिटन आणि आयर्लंडच्या सहा दिवसीय दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीम स्टार्मर यांची भेट घेतली. त्यानंतर ते लंडनच्या थिंक टँक चॅथम हाऊस येथे ‘हिंदुस्थानचा उदय आणि जागतिक स्तरावरील भूमिका’ या विषयावर संबोधित करण्यासाठी पोहोचले. या वेळी तिथे खलिस्तान समर्थक जमा झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
खलिस्तान समर्थकांनी हिंदुस्थानविरोधी घोषणाबाजी केली. एस. जयशंकर चॅथम हाऊसबाहेर पडल्यानंतर खलिस्तान समर्थक आणखीच चेकाळले आणि त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला.
🚨 : Khalistani goons attempt to heckle India’s External Affairs Minister @DrSJaishankar in London while he was leaving in a car. A man can be seen trying to run towards him, tearing the Indian national flag in front of cops. Police seem helpless, as if ordered to not act. pic.twitter.com/zSYrqDgBRx
— THE SQUADRON (@THE_SQUADR0N) March 5, 2025
एक व्यक्ती जयशंकर यांच्या गाडीसमोर आला आणि त्याने हातातील तिरंगा फाडण्याचा प्रयत्न केला. मात्र चॅथम हाऊसबाहेर उपस्थित पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखले आणि गाडीपासून दूर नेले. यावेळी खलिस्थान समर्थकांनी हातात झेंडे घेऊन घोषणाबाजीही केली.
#WATCH | London, UK | Pro-Khalistan supporters staged a protest outside the venue where EAM Dr S Jaishankar participated in a discussion held by Chatham House pic.twitter.com/ISVMZa3DdT
— ANI (@ANI) March 6, 2025
…तर कश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल
दरम्यान, चॅथम हाऊसमध्ये जम्मू-कश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मोठे विधान केले. पाकिस्तानने पीओके सोडून दिल्यास कश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल असे ते म्हणाले.