444 किलोच्या ‘हल्क’ला हवीय वधू, आतापर्यंत 300 मुलींना दिला नकार; ‘या’ आहेत अपेक्षा

8519

वय 27… वजन तब्बल 444 किलो. अगडबंब शरीराच्या एका तरुण सध्या वधूच्या शोधामध्ये  आहे. पाकिस्तानचा हा तरुण वेटलिफ्टर असून त्याचे नाव अरबाब खिजर असे आहे. खान बाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘हल्क’ला अति वजनामुळे वधू मिळणे अवघड झाले आहे. जोडा चांगला दिवसा अशी अपेक्षा असणाऱ्या खान बाबाने आतापर्यंत 300 मुलींना रिजेक्ट केले आहे. होणाऱ्या वधूचे वजन किमान 100 किलो असावे जेणेकरून आमचा जोडा छान दिसेल अशी खान बाबाची अपेक्षा आहे.

अरबाब हा खैबर पख्तूनख्वा जिल्ह्यातील मरदान येथील रहिवासी आहे. अगडबंब शरीर असणाऱ्या या तरुणाला आता लग्न करायचे आहे. याबाबत बोलताना तो सांगतो, माझ्या वडिलांना असे वाटते की आता मी विवाह करावा. परंतु आतापर्यंत एकही योग्य वधू मिळाली नाही. गेल्या सात वर्षांपासून आम्ही वधूचा शोध घेत आहोत. या दरम्यान 200 ते 300 मुलींना पाहिले, मात्र त्यांचे वजन सामान्य असल्याने मी नकार दिला, असेही तो म्हणाला.

काय आहेत अपेक्षा?
अरबाबच्या कुटुंबाची अपेक्षा आहे की होणारी वधूची उंची सहा फूट चार इंच असावी, कारण अरबाब हा सहा फूट सहा इंच उंच आहे. यासह तिला चांगले जेवण बनवता यायला हवे. अरबाब याचा रोजचा आहार प्रचंड असल्याने त्यांनी ही अट ठेवली आहे. अरबाब रोज सकाळी नाश्ता करताना 36 अंडी खातो. यासह दिवसभरात तो चार कोंबडे फस्त करतो. यासह पाच लीटर दूधही पितो.

khan-baba

जगातील सर्वात ताकदवर व्यक्ती बनायचंय
अरबाबला जगातील सर्वात ताकदवर व्यक्ती बनायचं आहे. त्यामुळे त्याने लहानपणापासून आपले वजन वाढवण्यास सुरुवात केली आणि तो अद्यापही सुरुच आहे. आपल्याला कोणताही आजार नसून एकदम फिट असल्याचेही तो सांगतो.

khan-baba1

तेव्हा आला चर्चत…
ट्रॅक्टरला दोरी बांधून खेचल्यानंतर अरबाब चर्चेत आला होता. 2012 मध्ये आपण 5000 किलो वजन उचलले होते असा दावाही अरबाब याने केला होता. डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आपल्याला मेडल मिळाले असून त्याची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये असल्याचे तो सांगतो. परंतु त्याच्या या दाव्यांमागे किती सत्य आहे हे समोर आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या