तपसे चिंचोली येथील ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा महोत्सवास सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। किल्लारी

तपसे चिंचोली येथील ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा चंपाषष्ठी महोत्सवास दिनांक 9 डिसेंबर 2018 पासून प्रारंभ झाला आहे. रविवारी सकाळी घटस्थापना व श्रीच्या अभिषेक व खंडोबावारीने यात्रा महोत्सवास सुरूवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चंपाषष्ठी यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती खंडोबा यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

यावर्षीचा खंडोबा यात्रा महोत्सव (सट) 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. या यात्रा महोत्सवात सोमवारी सत्संग कार्यक्रम व त्याच रात्री राजुरीकर वाघे यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम, सांप्रदायिक भजनी व गावकरी भजनी मंडळाचा कार्यक्रम ,बुधवार 12 तारखेला रात्री 8 वाजता स्वरसम्राट, कलाभूषण गायक मनोज भडकवाड, कलाभूषण कुणाल सुर्डीकर आणि सहकाऱ्यांचा भव्य गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 13 तारखेला पहाटे पाच वाजता काकड आरती,महाप्रसाद आणि सकाळी दहा वाजता बोरामनी व अनसरवाडा भारुडकर यांचा जंगी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी एक वाजता प्रमुख अतिथींची मंदिराला भेट ,सोबतच देवस्थान कमिटीच्या वतीने प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवराज पाटील चाकूरकर हे उपस्थित राहणार आहेत ,तसेच आमदार बसवराज पाटील,शैलेश पाटील,जयंत काथवटे अँड.बादाडे, राजेश्वर बुके,अशोकराव काळे,प्रकाश मोकाशे, दयानंदअप्पा मुगावे,ज्ञानोबा जाधव,सुभाष पवार,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.13 तारखेला सायंकाळी सात वाजता अनेक मानाच्या काठ्या व पालख्या वारू मंडळाच्या वतीने वाजतगाजत गावातून सबिना निघणार आहे.

यात्रा महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानचे मार्गदर्शक माधवराव पाटील,अध्यक्ष शेषेराव पाटील ,सतीश बिराजदार,मारुती नेटके,डॉ दिगंबर नेटके,अंगद नेटके,महेश पाटील, सिताराम शिंदे,अशोक लोंढे, बालाजी कदम,लालाजी नेटके,प्रशांत काळे,प्रमोद नेटके, देविदास कसबे,दिलीप नेटके,दत्ता मोरे,सुरेश सांगवीकर,प्रदीप नेटके यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.