किर्लोस्‍करकडून मोठी घोषणा, ‘हाय-ए‍फिशिएन्‍सी लो व्‍होल्‍टेज इलेक्ट्रिक मोटर्स’ लाँच करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kirloskar

किर्लोस्‍कर ऑईल इंजिन्‍स लिमिटेड (केओईएल) ही इंजिन्‍स, पॉवर जनरेटिंग सेट्स व कृषी उपकरणांमधील उद्योग अग्रणी कंपनी अनेक दशकांपासून जगभरातील लोकांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यामध्‍ये सहाय्यक राहिली आहे. नवीन उत्‍पादने व सेवा सादर करत ग्राहकांच्‍या जीवनामध्‍ये सकारात्‍मक परिणाम घडवून आणण्‍याच्‍या दृष्टीकोनाशी बांधील राहत किर्लोस्‍कर ऑईल इंजिन्‍स लिमिटेड ‘हाय-ए‍फिशिएन्‍सी लो व्‍होल्‍टेज इलेक्ट्रिक मोटर्स’ लाँच करत आहे, ज्‍या उद्योगक्षेत्रांमधील सर्व उपयोजनांमध्‍ये मशिन्‍सना शक्‍ती देतील.

उच्‍च दर्जाची कामगिरी व कार्यक्षमतेच्‍या खात्रीसाठी या मोटर्स बीआय-प्रमाणित, एनएबीएल-मान्‍यताकृत टेस्‍ट लॅबकडून चाचणी करण्‍यात आलेल्‍या हाय-ग्रेड कॉपर वायर्स व टाइपसह उत्‍पादित करण्‍यात आल्‍या आहेत. दर्जात्‍मक उत्‍पादनांची श्रेणी, सर्वोत्तम विक्री व सेवा नेटवर्कच्‍या पाठबळासह किर्लोस्‍कर ऑईल इंजिन्‍स ‘अपेक्षांपलीकडे कामगिरी’ या मिशनसह इलेक्ट्रिक मोटर्स बाजारपेठेत भव्‍य प्रवेश करत आहे.

याप्रसंगी बोलताना कार्यकारी अध्‍यक्ष श्री. अतुल किर्लोस्‍कर म्‍हणाले,”आम्‍ही नेहमीच ग्राहकांचे समाधान करण्‍यासोबत त्‍यांना बचत करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी उत्‍पादने व सोल्‍यूशन्‍स सादर केले आहेत. हीच परंपरा कायम राखत आम्‍हाला किर्लोस्‍कर मोटर्सची आमची नवीन श्रेणी सादर करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही आजच्‍या लाँचचे श्रेय विद्यमान डिलर्सचे आमचे व्‍यापक नेटवर्क आणि आमच्‍याकडून हा पुढाकार घेतले जाण्‍याची वाट पाहत असलेल्‍या ग्राहकांना जाते. आम्‍ही नवीन विस्‍तारीकरण योजनांना चालना देत आहोत, प्रबळ आरअॅण्‍डडी व्‍यासपीठ निर्माण करत आहोत आणि नवीन बाजारपेठांमध्‍ये प्रवेश करत आहोत. मोटर्सची आमची नवीन श्रेणी दर्जात्‍मक कार्यक्षमता देईल आणि उच्‍च-कार्यक्षमतेमुळे ऊर्जा वापर कमी करेल.”

याप्रसंगी बोलताना किर्लोस्‍कर ऑईल इंजिन्‍स लिमिटेडच्‍या संचालक गौरी किर्लोस्‍कर म्‍हणाल्‍या,”सातत्‍यपूर्ण सक्रिय नियोजन आणि धोरणात्‍मक उपाययोजनांनी आम्‍हाला इंजीनिअरिंग सोल्‍यूशन्‍सचा मान्‍यताकृत प्रदाता बनवले आहे. किर्लोस्‍करने डिझेल इंजिन्‍समधील प्रमुख कंपनी म्‍हणून स्‍वत:चे स्‍थान स्‍थापित केले असले तरी इलेक्ट्रिक मोटर्सच्‍या क्षेत्रामधील हे पाऊल या विभागामध्‍ये देखील आमची उपस्थिती स्‍थापित करण्‍यासोबत वाढवेल.” त्‍या पुढे म्‍हणाल्‍या,”या मोटर्स अद्वितीय दर्जाच्‍या आहेत, ज्‍या विश्‍वसनीयता, टिकाऊपणा व कार्यक्षमतेच्‍या सर्वोच्‍च पातळीची खात्री देतात.”

ही मोटर श्रेणी लाँच करत किर्लोस्‍कर ऑईल इंजिन्‍स समूहाचा नवोन्‍मेष्‍कारी उत्‍पादने प्रदान करण्‍याच्‍या उपक्रमाला कायम ठेवते, जो त्‍यांच्‍या अमर्याद व्‍यवसाय दृष्टीकोनाशी संलग्‍न आहे.