
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिजमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत केएल राहुलने दमदार शतक ठोकले आहे. राहुलने 190 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने शतकाला गवसणी घातली. राहुलचे हे कसोटी कारकिर्दीतील अकरावे शतक ठरले. विशेष म्हणजे राहुलने तब्बल 9 वर्षानंतर घरच्या मैदानावर कसोटीत शतक ठोकले आहे.
शुक्रवारी दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानने 2 बाद 121 धावांवरून आपला पहिला डाव सुरू केला. केएल राहुल 53, तर शुभमन गिल 18 धावांवर नाबाद होता. पहिल्या सत्रात कर्णधार गिल अर्धशतक ठोकून बाद झाला. त्याने 100 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. त्यानंतर राहुलने ध्रुव जुरेलच्या मदतीने धावफलक हलता ठेवला आणि लंचपूर्वी राहुलने शतक ठोकले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 11 वे शतक होते. मात्र शतकानंतर तो जास्त काळ टिकू शकला नाही आणि 100 धावांवर बाद झाला.
नऊ वर्षानंतर घरच्या मैदानावर शतक
केएल राहुल याने तब्बल नऊ वर्षानंतर घरच्या मैदानावर शतक ठोकले आहे. 2016 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत 199 धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने 9 शतके झळकावली, मात्र ती सर्वच विदेशात होती. घरच्या मैदानावर त्याला शतक हुलकावणी देत होते. मात्र हा दुष्काळ संपवत त्याने शतक ठोकले.
📸📸
A special knock calls for a special celebration 😍
Describe KL Rahul’s knock so far 👇
Updates ▶ https://t.co/MNXdZcelkD#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank | @klrahul pic.twitter.com/yX2OK3TVno
— BCCI (@BCCI) October 3, 2025