रत्नागिरीत एसटीच्या साडेतिनशे गाड्या सुरू, 21 सप्टेंबरपासून शहरी वाहतूक सुरू होणार

महाराष्ट्र परिवहन विभागाने एसटीतून 44 प्रवाशांची वाहतूक सुरू केली आहे. सुमारे 300 गाड्या तालुक्यांतर्गत वाहतूकीसाठी आणि 50 गाड्या जिल्हांतर्गत वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच एसटी वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवून एका गाडीतून 22 प्रवाशांची वाहतूक सुरू झाली. आजपासून एसटीची प्रवासी संख्या दुप्पट करण्यात आली. एका सीटवर दोन प्रवाशांची वाहतूक सुरु करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे साडेतिनशे गाडया सुरु करण्यात आल्या आहेत. गाड्या सॅनिटायझर करण्यात आल्या असून प्रवाशांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरातील बस वाहतूकही बंद आहे. रत्नागिरीतील शहरी बस सेवा 21 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे रत्नागिरी आगाराच्या वतीने कळवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या