कोकणात शिमगोत्सव धुमधडाक्यात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारा गावच्या, बारा वेशीच्या,बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या बारा शहराच्या देवा महाराजा़… आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे-कोतारे, मिळानं साजरे कंरतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर.. जी काय इडा पीडा, वाकडा-नाकडा असात त दूर कर रे महाराजा… होय महाराजा…अशी ग्रामदेवतेला गार्‍हाणी घालत, हुरा रे हुरा आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे होरयो… आखाडी रे आखाडी आमच्या भगवतीमातेची सोन्याची पाखाडी… अशा जोरदार फाका देत कोकणात धुमधडाक्यात गुलालाची उधळण करत ग्रामदेवतेची पालखी डोक्यावरुन नाचवत शिमगोत्सव साजरा झाला.

सोमवारी रात्री होम पेटवून जोरदार हाका देत शिमगा उत्साहात साजरा कंरण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4,246 ठिकाणी शिमगोत्सव साजरे करण्यात आले. त्यामध्ये 1,243 ठिकाणी सार्वजनिकं शिमगा आणि 3,003 ठिकाणी खासगी शिमगोत्सव साजरे करण्यात आले. 1,095 ठिकाणी पालखी उत्सव साजरा कंरण्यात आला शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकंरमानी गावी आला होता गावकऱ्यांबरोबर चाकरमान्यानीही शिमगोत्सवात जोरदार फाका देत खांद्यावरुन आणि डोक्यावरुन पालखी नाचवत शिमगा साजरा केला़ ग्रामदेवतेचे दर्शन घेत हातभेटीचा नारळ अर्पण करण्यात आला काहींनी नवस फेडले तर काहींनी नवस बोलले रत्नागिरीतील श्रीदेव भैरीबुवांची पालखी सोमवारी रात्री मंदिरातून वाजतगाजत बाहेर पडली मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमली होती रत्नागिरी शहरातून प्रदक्षिणा कंरत आज दुपारी भैरीबुवांची पालखी झाडगाव येथील सहाणेवर विराजमान झाली त्यानंतर होळी उभारण्यात आली