कोल्हापूर शहरातील नागाळपार्क या उच्चभ्रू वसाहतीत एका शैक्षणिक संस्था परिसरात काम करत असलेल्या एका परप्रांतीय मजुर जोडप्याला बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आल्याने, त्यांनी बिबट्या आल्याचा फोन केला.पण त्यांच्या या गैरसमजाने पहाटेपासून तब्बल चार तासांहुन अधिक काळ पोलिस,अग्निशमन आणि वनखात्याच्या पथका ला चांगलेच कामाला लावल्याचा प्रकार समोर आला. अखेर परिसरासह सीसीटीव्हीची पाहणी करुन, गुरगुरणारे ते कुत्रे असल्याची खात्री झाल्यानंतर यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे परिसरातील नागरिकांना मात्र दिवसभर याची कुणकुणही लागली नव्हती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,शहराच्या मध्यवस्तीत उच्चभ्रू नागाळा पार्कात एका शिक्षण संस्थेच्या परिसरात बांधकाम सुरू आहे.येथे कामास असलेले एक परप्रांतीय मजूर दांपत्य शेडमध्ये झोपले होते.पहाटे त्यांना गुरगुरण्याचा आवाज येऊ लागल्याने, तै बिबट्याच असावा या समजुतीने त्यांनी पोलिसांना फोन लावला.यापुर्वी रुईकर काॅलनी या उच्चभ्रू वसाहतीत बिबट्या आल्याचा प्रकार घडला होता.तर काही महिन्यांपूर्वी नागाळापार्क परिसरात पहाटे वाट चुकलेला गवारेडा फिरताना आढळला होता.त्यामुळे पोलिसांसह महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.पहाटे साडेचार पासुन त्यांनी परिसरात त्या बिबट्याची शोध मोहीम सुरू केली.शाळा आणि काॅलेजच्या सर्व वर्ग खोल्यांचीही तपासणी केली. यावेळी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले असता,ते गुरगुरणारे कुत्रे असल्याची खात्री सर्वांना झाली.त्यामुळे वनविभागासह पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने सुटकेचा निःश्वास टाकत, शाळा,काॅलेज सुरू करण्यास हिरवा कंदील दिला.
तो वन्य प्राणी बिबट्या नसून कुत्रा
आज रोजी पहाटे चारच्या दरम्यान कोल्हापूर शहरातील विवेकानंद कॉलेज परिसरात वन्य प्राणी बिबट्या आल्याची तक्रार कलेक्टर ऑफिस जिल्हा आपत्ती त्यानुसार कोल्हापूर अग्निशामक दल, शाहूपुरी पोलीस स्टेशन, व वन विभाग कोल्हापूर येथील कर्मचारी तत्काळ जागेवर हजर झाले.पूर्ण परिसराची पाहणी केली असता,तो वन्य प्राणी बिबट्या नसून कुत्रा असल्याचे लक्षात आले.तरीही तक्रार भीतीपोटी गैरसमजातून असल्याचे निष्पन्न झाले.कोल्हापूर शहर व परिसरातील नागरिकांना वन विभागातर्फे आव्हान करण्यात येते की अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये वन्यप्राणी निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा