
कोल्हापूर जिल्ह्यात नव्या कोरोना बाधितांच्या तुलनेत आजही कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असुन मृत्युदरही कमी झाल्याने समाधानकारक चित्र दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत १३२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण बाधीतांची संख्या ४६ हजार ५०९ वर पोहोचली आहे.
चोवीस तासांत कोरोनामुक्त झालेल्या २९० जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ३८ हजार ८१२ कोरोना मुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासांत १० जणांचा व आतापर्यंत १ हजार ५३५ बाधीतांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण ६ हजार १६२ पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.




























































