
कोल्हापूर, इंचलकरंजी शहर तसेच हातकणंगले आणि करवीर तालुका कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरले आहेत. गेल्या चोवीस तासांत ५४५ नवे कोरोना पाॅझीटिव्ह रुग्ण आढळले. जिल्ह्यात आजअखेर एकूण बाधीतांची संख्या १८ हजार ४८७ झाली असून कोरोनामुक्त झालेल्या २०२ जणांना दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे. आता पर्यंत एकूण १० हजार ६६ कोरोना मुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिवाय गेल्या चोवीस तासांत २३ जणांचा व आतापर्यंत ५४७ बाधीतांचा मृत्यू झाला असून सध्या एकूण ७ हजार ८७४ पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.
गेल्या २४ तासात आढळलेल्या ५४५ रुग्णांमध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात २०८, इंचलकरंजीसह इतर नगरपरिषद क्षेत्रात १००, हातकणंगले ७२, करवीर ७१ असे नवे कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळुन आले आहेत. कोरोना हाॅटस्पाॅट असलेल्या शिरोळ तालुक्यात गेल्या चोवीस तासांत केवळ ३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.































































