
सातारा शहरालगत पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाकर ऑक्सिजन टँकरला गळती लागली. सायंकाळी सहाच्या सुमारास वाढे फाटय़ाजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात लोकांची घाबरगुंडी उडाली. दरम्यान, ऑक्सिजनची गळती थांबकिण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी सातारा पोलिसांनी धाक घेतली आहे.
ऑक्सिजनचा एक टँकर महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. आज सायंकाळी सहाच्या सुमारास काहीतरी गडबड झाल्यासारखे वाटल्याने चालकाने हा टँकर अचानक थांबविला. त्याकेळी टँकरमधून मोठय़ा प्रमाणात आकाज येऊ लागल्याने चालक घाबरला. त्याने खाली उतरून पाहिले असता, टँकरच्या पाठीमागून ऑक्सिजनगळती सुरू झाली होती. याची माहिती समजताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाक घेतली. उशिरापर्यंत ही गळती थांबविण्याचे प्रयत्न सुरू होते.


































































