दोन दुचाकींच्या अपघातात तरुण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील राधानगरी तालुक्यातील तिटवे-तुरंबे येथील प्रवेश कमानीनजीक हा अपघात झाला.

सुजित सदाशिव सुतार (26) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर दीपक लोहार हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.