Lok Sabha 2019 साध्वी प्रज्ञासिंहला ‘एटीएस’ने खोटय़ा प्रकरणात अडकवले

सामना ऑनलाईन । कोलकता

भोपाळ येथून लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात उतरलेल्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पाठराखण केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटांच्या खोटय़ा प्रकरणात ‘एटीएस’ने साध्वी प्रज्ञा यांना अडकविल्याचे त्यांनी कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह वादात सापडल्या आहेत. याबाबत अमित शहा यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता साध्वीकर खोटे आरोप करून बोगस प्रकरणात त्यांना अडककण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हिंदू दहशतवादाच्या नावाने एक बोगस केस तयार करण्यात आली. जगात देशाच्या संस्कृतीची बदनामी करण्यात आली. न्यायालयात याबाबतचा खटला चालल्यानंतर तो बोगस असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी ज्यांना आधी पकडले होते त्यांना नंतर का सोडलं असा प्रश्न त्यांनी केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी बंगालमध्ये परिवर्तन होणार असे ते म्हणाले.