हम्पीचे दोन महिन्यांत दुसरे विजेतेपद

296

वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिने दोन महिन्यांत दुसरे विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. तिने रविवारी अमेरिकेतील सेंट लुई येथे झालेल्या केर्न्स कप बुद्धिबळ स्पर्धेचा किताब जिंकला. विजेत्या कोनेरी हम्पीला 45 हजार डॉलर्सचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हे रॅपिड वर्ल्ड टायटल जिंकणारी हम्पी ही माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद याच्यानंतर हिंदुस्थानची दुसरी बुद्धिबळपटू होय हे विशेष.

कोनेरू हम्पीने नवव्या व अखेरच्या फेरीत आपलीच देशभगिनी हरिका द्रोणवल्ली हिच्याशी ड्रॉ खेळून सर्वाधिक 6 गुणांची कमाई करून जेतेपदावर आपले नाव कोरले. या जेतेपदामुळे कोनेरू हम्पीला जागतिक क्रमवारीतही फायदा झाला असून तिने दुसऱया स्थानी झेप घेतलीय. या स्पर्धेत वेंजुन जू हिला 5.5 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

आपली प्रतिक्रिया द्या