
एखादी गोष्ट मिळविण्याची जिद्द असेल आणि ती मिळविण्यासाठी प्राणाणिक प्रयत्न असेल तर जगात अशक्य असे काहीच नाही. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण कोरियातील एक महिला. एक-दोन नव्हे तब्बल अठरा वर्षानंतर एका महिलेला वयाच्या 69 व्या वर्षी ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले आहे. 960 वेळा प्रयत्न केल्यानंतर आता या महिलेला यश मिळाले आहे.त्यांच्या जि्दीला एक सलाम व्हायलाच हवा.
मिररच्या वृत्तानुसार, सा-सून असे त्या महिलेचे नाव असून ती दक्षिण कोरियातील जियोंजू येथे राहते. तिने त्यानंतर आठवड्यातून दोनदा लेखी परीक्षा द्यायला सुरूवात केली. यात पास झाल्यानंतर ती प्रॅक्टीकल टेस्टची वेळ आली. 10 वेळा प्रयत्न केल्यानंतर ती ड्रायव्हिंग टेस्ट पास झाली. जवळपास 960 वेळा तिने परीक्षा दिली आहे आणि आता त्या महिलेला ड्रायव्हिंग लायसेन्स मिळाले आहे.
वृत्तानुसार, या सगळ्यात सा-सूनचे 11 हजार पाऊंड म्हणजेच 11 लाख रूपये खर्च झाला आहे. ती आपले कुटुंब चालविण्यासाठी भाजी विकण्याचे काम करते. या व्यवसायासाठी तिला ड्रायव्हिंग लायसेन्सची अत्यंत गरज होती. त्याचसाठी तिने इतक्यांदा अपयश येऊनही हार मानली नाही. तिच्या ड्रायव्हिंग प्रशिक्षकाने सांगितले की, त्यांना आता खूप बरे वाटत आहे. त्यांनी सांगितले, जेव्हा सा-सून यांना ड्रायव्हिंग लायसेन्स मिळाले त्यावेळी आम्ही सर्व खूप खुश झालो आणि त्यांना फुलगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. आमच्या खांद्यावरून मोठं ओझं कमी झाल्यासारखे वाटले. आमच्यात एवढी हिंमत नव्हती की त्यांना हार मानण्यास सांगायला कारण त्या प्रयत्न करत होत्या.
शेकडो प्रयत्न केल्यानंतर सा-सून आता सेलिब्रिटी झाल्या आहेत. ह्युंदाई या कार कंपनीच्या जाहिरातीतही त्या दिसल्या होत्या. दक्षिण कोरियाची कंपनी ह्युंदाईने त्यांना 11,640 पौंड म्हणजेच सुमारे 11.78 लाख रुपये किंमतीची कारही भेट दिली आहे. कोरियन ड्रायव्हर्स लायसन्स एजन्सीनुसार, 50 मिनिटांच्या लेखी परीक्षेत रस्त्याचे नियम आणि कार देखभाल यावरील 50 वेगवेगळे प्रश्न असतात. सा-सून यांनी सांगितले की, ‘माझा विश्वास आहे की जर तुम्ही हार न मानता सातत्याने प्रयत्न केले तर तुम्हाला हवं ते साध्य करू शकता.


























































