वैद्यकीय प्रवेशपूर्व परिक्षेत नांदेडच्या आयआयबीचा कृष्णा अग्रवाल राज्यात प्रथम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

प्रवेशपूर्व परीक्षा नीट-२०१८ चा निकाल जाहीर झाला आहे. नांदेडच्या आयआयबीचा विद्यार्थी कृष्णा अग्रवाल हा नीट परिक्षेत महाराष्ट्रात पहिला आला आहे. या परिक्षमध्ये कृष्णा अग्रवाल याने देशात सातवे मानांकन मिळवत बायोलॉजी विषयात सुक्ष्म मार्गदर्शनातले नांदेडच्या आयआयबीचा चे श्रष्ठत्व सिध्द केले आहे. विशेष म्हणजे या वर्षीच्या नीट परिक्षेत राज्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान आयआयबीच्या तेजस्वीने विठ्ठलराव बनबरे हिने मुलींमध्ये प्राप्त केला आहे. लोकेश मंडलेचा महाराष्ट्रात नीट परिक्षेमध्ये तिसरा आला आहे.

नीट-२०१८ या परीक्षेमध्ये देश आणि राज्य पातळीवर गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा आयआयबीमध्ये गौरव सोहळा घेण्यात आला. या सोहळ्यात आयआयबीचे व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी आयआयबीच्या टीमने सर्वांचे कौतुक केले.

नीट-२०१८ या परिक्षेच्या हाती आलेल्या निकालानुसार आयआयबीने याही वर्षी वैद्यकीय प्रवेशपूर्व परिक्षेच्या निकालावर आपली मोहर उमटविली आहे. बायोलॉजी विषयात देशात सातवा आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेल्या कृष्णा अग्रवाल याने ३६० पैकी ३५० गुण प्राप्त केले आहे. नीट परिक्षेत ७२० पैकी ६८५ गुण त्याने पटकावले आहे.

नीट परिक्षेत ६५५ गुण घेणाऱ्या अभिजित कदम याने बायोलॉजीमध्ये ३६० पैकी ३४५ गुण मिळवले आहेत. लोकेश पारस मंडलेचा या आयआयबीच्या विद्यार्थ्याने नीटमध्ये ६७० तर बायोलॉजीमध्ये ३४० गुणांवर झेप घेतली.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी नीट-२०१८ च्या निकालावर नांदेडच्या आयआयबीचा ठसा उमटला आहे. नीटमध्ये ७२० पैकी कृष्णा अग्रवाल (६८५) गुण घेतले. लोकेश मंडलेचा (६७०), प्रशांत वायाळ याने ६६१, रोहिणी गटांनी (६५१), सत्यम मेटे (६४५), मृदुला भालके (६३३), फय्याज बागवान (६३०), प्रज्ज्वल तंगडी (६२७), आर्या देशमुख (६२३), प्रतिकेश सरनाईक (६२०), विजय हांगे (६२०), प्रतिभा जनगोंडा (६१५), तुषार भोसले (६१५), स्वप्नील देलमाडे (६११), श्रेयस चांडक (६०८), अभय पुरी (६०५), ऋषिकेश जोशी (६०८), (६०५), मयूर बावनकर (६०२), वैष्णवी कुसुमकर (६०१), संकेत चंद्रमदने (४९४), अभ्युदय खटींग (५९३) व विशाखा वाघ (५८५) हे विद्यार्थी नीट-२०१८ मध्ये गुणवंत ठरलेले आहेत.

राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या नीट परिक्षेत बायोलॉजी विषयात आयआयबीचे विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. ज्यामध्ये कृष्णा ग्रिवाल (३५०), अभिजीत कदम (३४५), रोहित गट्टानी (३४१), आर्या देशमुख (३४१), लोकेश मंडलेचा (३४०), यशेस मुनेश्वर (३४०) आकांक्षा पडलवार (३४०), कुरेशी शब्बीर (३४०), प्रतिकेश सरनाईक (३४०), महेश लोंढे (३३८), मयूर बावनकर (३३८), मृदुला भालके (३३५), प्रज्ज्वल तंगडी (३३२), वैष्णवी कुसुमकर (३३२), मयूर वानखेडे (३३२), रुतुजा बिडवे (३३१) आणि माणिक लालवाडे (३३१) यांचा समावेश आहे.

…..तर कृष्णा अग्रवाल देशात तिसरा असता
नीट परिक्षेत देशात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थिनी कल्पना कुमारी हिला ६९१ गुण प्राप्त झालेले आहेत. दुर्देवाने कृष्णा अग्रवाल या विद्यार्थ्याने नीट परिक्षेच्या प्रश्न क्रमांक १० आणि प्रश्न क्रमांक १४३ या दोन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिलेली आहेत. परंतु उत्तरपत्रिकेवर (ओएमआर अन्सर शीट) कृष्णा अग्रवाल याने केलेले वर्तुळ थोडेसे अस्पष्ट असल्याने त्याचे पाच मार्क या परिक्षेतून वजा झाले आहेत. अन्यथा कृष्णा अग्रवाल याला नीट-२०१८ मध्ये देशात तिसरा येण्याचा गौरव प्राप्त झाला असता.