
सामना ऑनलाईन । लाहोर
एका क्लिकवर हवी ती माहिती उपलब्ध करून देणाऱ्या लोकप्रिय गुगलने पाकिस्तानात मात्र खळबळ उडवली आहे. गुगलने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना चक्क भिकारी बनवून टाकलं आहे. यामुळे संतापलेल्या पाकड्यांनी गुगलच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना समन्स पाठवलं आहे.
गुगलच्या सर्च इंजिनवर भिकारी सर्च केल्यावर इमरान खान यांचा फोटो येतो. या मथळ्याखाली पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने तो फोटो आणि पाकिस्तानच्या संसदेने गुगलच्या सीईओंना पाठवलेल्या समन्सची प्रत पोस्ट केली. यामुळे इमरान खान यांच्यावर जगभरातून टीका करण्यात आली. तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर पाकड्यांनी कडाडून टीका केली.
पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या तिजोरीत परदेशी चलनाचा तुटवडा आहे. यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानला मदत मिळवून देण्यासाठी इमरान खान अनेक देशांचे उंबरठे झिजवत आहेत. आतापर्यंत इमरान यांनी सौदी अरेबिया, चीन यासोबतच अनेक देशांकडे मदतीसाठी हात पसरले आहेत. सौदीने पाकिस्तानला 6 अरब डॉलर कर्ज देण्याची घोषणा केली आहे. चीननेही पाकिस्तानला आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानने आयएमएफकडेही मदतीची याचना केली आहे. तसेच पाकिस्तान सरकारनेही वायफळ खर्च टाळण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान झाल्यावर इमरान खान यांनी काटकसर म्हणून आपल्या ताफ्यातील अनेक आलिशान गाड्यांचा लिलाव केला होता. यामुळे जगासमोर पाकिस्तानची केविलवाणी अवस्था समोर आली. त्यानंतर जगभरात मदतीसाठी फिरणाऱ्या इमरान खान यांच्यावर मीम्सही बनवले गेले. पण गुगल सर्चनेही इमरान यांना भिकाऱ्यांच्या पंक्तीत बसवल्याने पाकडे चांगलेच चवताळले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेच्या संसदेत हजर झाले होते. त्यावेळी त्यांना गुगलवर मूर्ख (इडियट) सर्च केल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो का येतो असा सवाल करण्यात आला होता. यावर पिचाई यांनी गुगल सर्च इंजिन एल्गोरिदमवर काम करते. तसेच त्यावर माहिती देण्यासाठी जवळपास 200 यंत्रणा काम करत असतात. त्यानंतर तिथून आलेल्या मिळत्या जुळत्या माहितीवर, व्यक्तीच्या लोकप्रियतेवर विश्लेषण केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या माहितीवर सर्च इंजिन माहिती पुरवते असे त्यांनी सांगितले होते.
Resolution submitted in Punjab assembly to summon Google CEO and ask him to explain why search for ‘bhikari’ shows PM Imran Khan’s photo. pic.twitter.com/PTlBP49G3l
— Naila Inayat (@nailainayat) December 15, 2018






























































