
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मराठवाडय़ातील माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांमधील पहिली ते बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. पुस्तक, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास, पेन आणि पेन्सिल सेट, शाळेची बॅग अशा शैक्षणिक साहित्याची मदत घेऊन जाणारे ट्रक उद्या, रविवारी सकाळी 11 वाजता लालबाग मार्पेट येथून रवाना होणार आहेत. मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे 60 कार्यकर्ते मराठवाडा येथे जाणार आहेत.