
सामना प्रतिनिधी । देवरुख
संगमेश्वर तालुक्यात जमीन खचणे असे प्रकार सुरू असताना सोमवारी चाफवली करवंजेवाडी येथे जमीन खचल्याची घटना घडली आहे. मोठा चर पडल्याप्रमाणे जमीन खचली आहे. तालुक्यातील चाफवली करवंजेवाडीतील शेवरीचे भाटले येथे सोमवारी सायंकाळी वाडीतील ग्रामस्थ विजय विभुते, दिपक बोडेकर, संतोष बोडेकर, साहिल बोडेकर आदी. कामानिमित्त त्या ठिकाणी गेले होते. यावेळी त्यांना जमीन खचल्याचे दिसून आले. ही जमीन सुमारे अडीचशे फुट लांब आणि चाळीस फुट खोल खचली आहे. तर काही ठिकानी भेगाही पडल्या आहेत. सोमवारी सायंकाळी ही घटना निदर्शनास आल्याने महसूलचे अधिकारी पोहचू शकले नव्हते. खचलेल्या ठिकानी शेजारी एक ओढा आहे. या प्रकारामुळे मनुष्यवस्तीला धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




























































