
करोना संक्रमण आणि लॉगडाऊनमुळे दोन वर्षापासून शीतपेयांची दुकाने बंद होती. या वर्षी करोनाची तिसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे व्यवसायांना गती मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे रसवंती, शीतेपेय, लस्सी, कुल्फी, बर्फ गोळा, कुल्फी, रस महागणार आहे.
शहरात, रस्त्याच्या कडेला शीतपेय विक्रीची दुकाने थाटली आहेत. यातून अनेक नागरिकांना रोजगार मिळणार आहे. दोन वर्षासून शीतपेयांची दुकाने बंद होती. यावर्षी कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे व्यावसायिकांनीही मोकळा श्वास घेतला आहे. बंद पडलेल्या शीतपेयांच्या चाकांना गती मिळत आहे. शहरात रसवंतीची अनेक दुकाने आहेत, तसेच लिंबू सरबत विक्रीच्या हातगाड्यांचीही भर पडली आहे. यातच रसवंती विकणाऱ्या व्यावसायिकांनी शक्कल लढवून गाडीवरच ऊसगाळण्याचे यंत्र बसविले आहे. याखेरीज लस्सी, आईस्क्रीम, कुल्फी, मसाले ताकाची दुकाने थाटली आहेत.
कच्च्या मालाच्या किमतीत वाढ
मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा या व्यवसायाला महागाईचा फटका बसला आहे. शीतेपेयांच्या किमतीतही वाढ झाली आहे. यावर्षी लग्नसराईची धूम आहे. त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढणार आहे. महागाईमुळे ऊस, कुल्फी, पेप्सी, लस्सी तयार करण्यासाठी लागणारा कच्च्या माल महाग झाला आहे. यामुळे शीतपेयांच्या किमती वाढल्या आहेत. रसवंतीला लागणारा ऊस परजिल्हयातून येतो. मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी उसाचे भाव टनामागे पाचशे ते हजार रूपायांनी वाढले आहेत.



























































