नरेंद्र मोदींच्या कवितेला लतादीदींचा आवाज, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात एक कविता ऐकवली होती ती कविता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड केली असून त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला लता मंगेशकर या कवितेबद्दल प्रस्तावना सांगतात. ‘काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण मी ऐकत होते. त्यात त्यांनी एका कवितेच्या ओळी सादर केल्या होत्या. त्यावेळी मला असं वाटलं की त्या कवितेच्या ओळी या प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनातलं सांगत आहेत. मला ती कविता फार आवडली. त्यामुळे मी ती कविता रेकॉर्ड केली आहे. आज मी ती कविता देशाच्या जवानांना आणि जनतेला समर्पित करते’असे लतादिदींनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लता मंगेशकर यांचे ट्विट रिट्विट केले आहे.