चौथा दिवस न्यूझीलंडचा, लॅथमच्या 154 धावा

297

कोलंबो येथे सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱया कसोटीचा चौथा दिवस पाहुण्या न्यूझीलंडने गाजवला. सलामीवीर टॉम लॅथमने 154 धावांची सणसणीत खेळी साकारताना लंकन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. आता बी. जे. वॉटलिंग 81 धावांवर तर कोलिन डी ग्रॅण्डहोम 83 धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडने चौथ्या दिवसअखेरीस 5 बाद 382 धावा केल्या असून आता त्यांचा संघ 138 धावांनी आघाडीवर आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात 244 धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडने 4 बाद 196 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरूवात केली. टॉम लॅथम व बी. जे. वॉटलिंग या जोडीने 143 धावांची भागीदारी रचली. टॉम लॅथमने 15 चौकारांसह 154 धावा तडकावल्या. दिलरूवान परेराच्या गोलंदाजीवर तो बाद झाला आणि जोडी तुटली. त्यानंतर बी. जे. वॉटलिंग व कोलिन डी ग्रॅण्डहोम या जोडीने अभेद्य 113 धावांची भागीदारी करीत लंकन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. बी. जे. वॉटलिंग चार चौकारांसह 81 धावांवर तर कोलिन डी ग्रॅण्डहोम पाच चौकार, पाच षटकारांसह 83 धावांवर खेळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या