‘लाच मागायची पण घ्यायची नाही’, सहाय्यक पोलीस निरीक्षका विरुध्द गुन्हा दाखल

1656

मामा -भाच्चा यांचे विरोधात कारवाई टाळण्यासाठी किनगाव पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक धोंडिराम निवृती सोनहिवरे (57) याने लाचेची मागणी केली. मात्र संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. किनगाव पोलीस ठाण्यातच त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडिराम निवृती सोनहिवरे यांनी दाखल झालेल्या तक्रारी मध्ये कारवाई न करण्यासाठी पाच हजाराची लाच मागितली होती. मात्र तडजोडीनंतर चार हजार रुपये घेण्यााचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला मात्र संशय आल्याने सोनी हिवरे यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोनहिवरे यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या विरोधात किंवा पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या