लातूरमध्ये तोतया पोलीसांची लुटमार, दोन तोळयाची चैन व एक तोळ्याची अंगठी पळवली

crime

लातूर शहरात तोतया पोलीसांची लुटमार सुरु आहे. आम्ही पोलीस आहोत असे सांगून रस्त्यावरुन जाणाऱ्या वयोवृध्द नागरीक, महिलांचे सोने पळवण्याचे काम होत आहे. शहरातील औसा रोडवर दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि एक तोळयाची सोन्याची अंगठी दोघा नकली पोलीसांनी पळवली.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केशव मुकूंदराव खरोसेकर वय 64 वर्षे रा. दत्त मंदिरच्या पाठीमागे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की ते राजीव गांधी चौकाकडे औसा रस्त्याने जात असताना त्यांच्याजवळ दुचाकीवरुन दोघे अनोळखी युवक आले. त्यांनी आम्ही पोलीस आहोत असे सांगून तुमच्या जवळील सोने हातरुमालमध्ये बांधून ठेवा असे सांगीतले आणि रुमालात सोन्याचे दागीने ठेवत असताना हातचालाखीने दोन तोळयाची सोन्याची चैन आणि एक तोळयाची सोन्याची अंगठी पळवली. याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या इतरही एकास त्यांनी अशाच पध्दतीने फसवले म्हणून अज्ञात दोघांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. लातूर शहरात या घटनांमध्ये वाढ झालेली असून पोलसांसमोर या बनावट पोलीसांना पकडण्याचे अव्हान उभे ठाकले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या