
नावावर कोणतीही जमीन नसताना बनावट कागदपत्र दाखवून तब्बल 15 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भुषण विनोदकुमार काबरा रा. वाहतूकनगर, ओमकार सोसायटी अंधेरी पुर्व मुंबई यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, बाळासाहेब भोसले (रा. लातूर) याने फिर्यादीस लातूर येथे बोलावून घेतले.
त्याच्या नावावर कोणतीही जमिन नसताना फिर्यादीस खोटे व बनावट कागदपत्र दाखवून फिर्यादीकडून एचडीएफसी बँक शाखा बार्शी सेक्टर 17 चा 15 लाखांचा धनाकर्ष घेतला व रक्कम परस्पर नक्षत्र इंटरप्राईजेस या नावाने असलेल्या खात्यात वटवून घेऊन फिर्यादीची 15 लाख रुपयाची फसवणूक केली. बाळासाहेब भोसले याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.
























































