धक्कादायक! देवणी येथील बालगृहातून अल्पवयीन मुलीस पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील देवणी येथील बालगृहात ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीन पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवणी येथे बळीराजा सेवाभावी संस्था द्वारा संचलित कृष्णा माता मुलींचे बालगृह चालवण्यात येते. बालकल्याण समिती लातूरच्यावतीने धाराशिव जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते. 23 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुलीस पळवून नेले. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला परंतू ती सापडली नाही त्यामुळे शेवटी पोलीस ठाण्यात अधिक्षिका शामा पंढरीनाथ हेळगे यांनी तक्रार दाखल केली.