
मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. तब्बल 35890.00 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी सकाळी 10.30 वाजता मांजरा प्रकल्पाचे गेट क्रमांक 1, 2, 3, 4, 5 व 6 हे सहा गेट 0.50 मीटरने उचलण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची 6 वक्रद्वारे 2.00 मीटर ने चालू असून मांजरा नदीपात्रात 35890.00 क्युसेक्स (1016.40 क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे.
धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.





























































