लातूर – पानगाव येथे घर फोडले, 3 लाख 46 हजाराचा ऐवज पळवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेणापूर तालूक्यातील मौजे पानगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 3 लाख 46 हजाराचा ऐवज पळवण्यात आला. रेणापूर पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील चोरी प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात स्वाती सतीश राजपूत यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादी ह्या आपल्या आईकडे मारवाडी गल्ली पानगाव येथे राहात होत्या. घराला कुलूप लावून त्या बाहेरगावी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

कपाट फोडून लॉकर मधील 2 तोळ्यांचा गोफ असलेले सोन्याचे लॉकेट किंमत 50 हजार रुपये, 3 तोळ्यांचा गोफ असलेले लॉकेट किंमत 75 हजार रुपये, 5 ग्रॅम पिळ्याची सोन्याची अंगठी किंमत 11 हजार रुपये, 2 तोळ्यांचे पट्टीचे गंठण किंमत 50 हजार रुपये, अडीच तोळ्यांचे पट्टी आकाराचे नेकलेस किंमत 60 हजार रुपये असे एकूण 10 तोळ्यांचे सोन्याचे दागीने रोख रक्कम 1 लाख रुपये चोरुन नेले. अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.