लातूर – साडीने गळफास घेऊन दोन बहिणींची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरंगुळ बु. शिवारातील गोविंदनगर भागामध्ये दोन बहिणींनी एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.

बार्शीरोड हरंगुळ बु. शिवारातील गोविंदनगर भागात राहणाऱ्या गितांजली दत्तात्रय बनसोडे (वय – 17) आणि तिची मावस बहिण धनश्री संतराम क्षीरसागर (वय – 20, मुळ रा.कानेगाव ता. लोहारा जि. धाराशीव) यांनी एकाच साडीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिले.