
युवा व्हिजन या संस्थेतर्फे विविध क्षेत्रांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱया कर्तृत्ववान महिलेला दिला जाणारा ‘मदर इंडिया पुरस्कार’ यंदा भरतनाटय़म नृत्य प्रकाराच्या नामवंत प्रशिक्षक, ज्येष्ठ गुरू अर्चना पालेकर यांना देण्यात येणार आहे.
उद्या, 8 जुलै रोजी गिरगाव चौपाटी येथील रॉयल ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त ज्येष्ठ न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, सौ. रश्मी उद्धव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे युवा व्हिजनचे संस्थापक प्रथमेश सकपाळ यांनी सांगितले.
पालेकर यांच्या नेतृत्वात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ महाराष्ट्र गीत भरतनाटय़म या नृत्यप्रकारात सादर केले जाणार असून याची नोंद इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डस्मध्ये केली जाणार आहे.




























































