सावरी येथील अंगणवाडीच्या शौचालयात बिबट्या घुसला

142

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

भद्रावती तालुक्यात सावरी येथे अंगणवाडीच्या शौचालयात बिबट्या घुसलाय. त्याला तिथेच कोंडून ठेवण्यात आले असून वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहचले असून आता त्याला पकडण्याचे प्रयत्न करीत आहेत.

बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे. त्यात पावसाची रिपरिप, यामुळं पकडण्यात अडचणी येत आहेत. पहाटेच्या सुमारास हा बिबट्या इथं घुसला असावा असा अंदाज आहे. एक महिला इथं गेली असता, तिला बिबट्याचं शेपूट बाहेर आलेलं दिसलं. त्यामुळं हिम्मत करून तिनं शौचालयाचं दार बंद केलं आणि बिबट्या जेरबंद झाला.

आपली प्रतिक्रिया द्या