हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे डोळ्यांवर होतोय परिणाम, ‘हे’ 4 सोपे उपाय करा, डोळ्यांचे आरोग्य जपा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिवाळ्यात कोरड्या हवेचा डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. या दिवसांत डोळे, पापण्या कोरड्या पडतात. काही वेळा, डोळ्यांना खाज येते, डोळे लालसर होतात. कधी कधी डोळ्यांच्या पापण्या कोरड्या होतात. हिवाळ्यात डोळ्यांची आर्द्रता कमी झाल्यामुळे कोरडेपणाची समस्या जाणवते. थंडीतील डोळ्यांच्या तक्रारींकरिता घरच्या घरी उपाययोजना करून डोळ्यांच्या तक्रारी दूर होऊ शकतात.

पेट्रोलियम जेली
डोळ्यांच्या भोवतीने कोरडेपणा जाणवत असेल तर, पेट्रोलियम जेलीचा वापर करून पाहा. पापण्या आणि डोळ्यांच्या भोवती पेट्रोलियम जेली लावल्याने कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळेल. या जेलीचा योग्य वापर केल्याने डोळ्यांची आर्द्रता टिकून राहिल.

डोळे चोळू नका
डोळ्यांवर कोरडेपणा आल्यामुळे खाज सुटते. यामुळे डोळे लाल होतात. काही वेळा नेहमीपेक्षा आकाराने छोटे दिसतात. या समस्येपासून सुटका होण्यासाठी डोळ्यांना बर्फाने शेक द्यावा. यामुळे सूज आणि खाजेपासून आराम मिळतो.

कोमट पाण्याने चेहरा, डोळे धुवा
दिवसभर लॅपटॉपवर काम करून डोळ्यांवर ताण पडू लागतो. यामुळे थकल्यासारखे होते. याचाही परिणाम डोळ्यांवर होतो. अशावेळी चेहरा कोमट पाण्याने धुवावा. यामुळे डोळे स्वच्छ राहतील आणि आराम मिळेल.

डोळ्यांना एलर्जी वस्तूंपासून लांब ठेवा
प्रत्येकाच्या डोळ्यांना कोणत्या न कोणत्या वस्तूंची एलर्जी असू शकते. त्यामुळे ज्या वस्तूंमुळे डोळ्यांना अॅलर्जी होते, अशा वस्तू डोळ्यांपासून दूर ठेवा याशिवाय डोळ्यांना आराम देणंही महत्त्वाचं आहे.