
धावपळीच्या जीवनशैलीमुळे रेडी टू इट पदार्थांचे सेवन करण्याला लोकं प्राधान्य देतात. रेडी टू इटमध्ये डाळ, तांदूळ, भाज्या, विविध तऱ्हेचे स्कॅक्स अशा विविध अन्नपदार्थांचा समावेश होतो. रेडिमेड खाद्यपदार्थ फक्त उकळून किंवा काही वेळ गरम करून शिजवले जातात, मात्र असे लवकरात लवकर शिजवून पोट भरणाऱ्या पदार्थांमध्ये आरोग्याच्या तक्रारीही उद्भवू शकतात. यामुळे अकाली वृद्धत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. ब्राझीलमध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, रेडी टू ईट अन्नपदार्थ सेवन केल्याने अकाली मृत्यूचा धोका 10 टक्क्यांनी वाढतो. ‘या’ 5 अन्नपदार्थांचे सेवन केल्यास अकाली मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकता.
बदलत्या जीवनशैलीत लोकांकडे वेळ कमी पडतो आणि त्यांना घरी स्वयंपाक करायला वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत बाजारात उपलब्ध असलेले तयार पदार्थांची पाकिटे विकत घेण्याला पसंती दिली जाते. गेल्या काही वर्षांत रेडी टू इट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. बाजारात मिळणारे रेडी फूड किंवा पॅकेज्ड फूड हे आरोग्यदायी नसते. ते कितीही निरोगी असल्याचा दावा करत असले, तरी ते प्रिझर्वेटिव्ह, कार्ब, साखर आणि मीठ यांनी भरलेले असतात. यामध्ये जास्त प्रमाणात फ्लेवर्स टाकले जातात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यात पोषक तत्त्वे नसतात. त्यांचे दीर्घकाळ सेवन केल्याने मधुमेह, लठ्ठपणा, खराब कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
अल्ट्रा-प्रक्रिया केलेले पदार्थ
– अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमध्ये भरपूर चरबी, स्टार्च, साखर आणि अस्वास्थ्यकर चरबी असते. कारखान्यांत या अन्नपदार्थांवर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रक्रिया केल्या जातात. यामध्ये अन्नातील नैसर्गिक घटक काढून कृत्रिम घटक वापरले जातात. अल्ट्रा प्रक्रिया केलेले पदार्थ कॅलरी, साखर आणि मीठाने समृद्ध असतात. पिझ्झा, बटाटा टिक्की, कटलेट, चिप्स, पॅक केलेले सूप, नाश्ता कडधान्ये, कुकीज यांसारखे गोठलेले पदार्थ अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांच्या श्रेणीत येतात.
– अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड हा ताज्या अन्नाला पर्याय नाही, नफा कमावण्यासाठी तयार खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू झाला आहे. त्यात स्टार्च, अस्वास्थ्यकर चरबी आणि प्रथिने भरपूर असते. शिवाय वापरण्यात आलेले पदार्थ आरोग्यदायी नसतात. हे पदार्थ वर्षानुवर्षे साठवून तयार केले जातात. मोठ्या प्रमाणावर विकले जातात. त्यामुळे उत्पादन आणि साठवणूक खर्चही खूप कमी असतो. ताज्या अन्नपदार्थांपेक्षा या पदार्थांची पाकिटे स्वस्त मिळतात, असे असले तरीही घरी शिजवलेले आणि ताजे अन्नपदार्थ, दूध, अंड, विविध प्रकारच्या, मांसजन्य पदार्थ खाण्याला प्राधान्य द्यावे. जेणेकरून आजार, अकाली वृद्धत्व इत्यादी समस्यांपासून दूर राहायला मदत होईल.
























































