उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी आहारात करावा ‘या’ 4 सरबतांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च रक्तदाबाची समस्या अनुवांशिक असली तरीही आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली बऱ्याच जणांना या समस्येचा सामना करावा लागतो. उच्च रक्तदाबाच्या समस्येला सायलेंट किलर असेही म्हटले जाते. डोकेदुखी, जीव घाबरणे, चक्कर येणे, अचानक छातीत धडधड होणे अशा प्रकारच्या समस्या या त्रासामुळे होतात. उच्च रक्तदाबावर नियंत्रण नसेल तर भविष्यात ह्रदयविकार, स्ट्रोक येणे, हार्ट फेल अशा गंभीर आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. आहारविहारात केलेले योग्य बदल, जीवनशैलीतील सुधारणा याशिवाय काही पौष्टिक सरबतांचा आहारात समावेश केल्यास ह्रदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास आणि रक्तदाबावर नियंत्रण मिळण्यास मदत होते.

बीट ज्यूस
निरोगी ह्रदयासाठी बीट फायदेशीर आहे. बिटामध्ये नायट्रेट असते त्यामुळे रक्तदाबावर नियंत्रण येऊन ह्रदयाचे आजार आणि ह्रदयविकाराचा झटका टळू शकतो. यामध्ये अँण्टीइंफ्लेमेटरी, जीवनसत्त्व आणि मिनरल्स हे गुणधर्म असतात. यामुळे ह्रदय निरोगी राहते. याकरिता दररोज बीट खाणे आवश्यक आहे. बीट सलाड किंवा बीट ज्यूसचा आहारात समावेश करावा.

डाळिंबाचे ज्यूस
डाळिंब शरीरात रक्त वाढवण्याचे काम करते, पण त्याच्या अँटीहाइपरटेन्सिव्ह गुणधर्मांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. एका संशोधनानुसार, रक्तदाब कमी करण्यासोबतच रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करणारे गुणधर्मदेखील डाळिंबामध्ये आढळतात. याशिवाय डाळिंब खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.

ब्लूबेरी ज्यूस
ब्लूबेरी खाल्ल्याने सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल दोन्ही कमी होतात. ब्लूबेरीमध्ये हृदय निरोगी राखण्याचे गुणधर्म आहेत. दुकानातून ब्लूबेरीचा ज्यूस खरेदी केल्यास त्यामध्ये साखर नसल्याची खात्री करा.

टोमॅटो ज्यूस
टोमॅटोच्या रसात सिस्टोलिक आणि डायस्टोलिक हे गुणधर्म असतात. ज्यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते तसेच एलडीएल कोलेस्ट्रॉल सुधारते. टोमॅटोमध्ये कार्डिओ-संरक्षणात्मक गुणधर्म असतात. यामधील लाइकोपीन, बीटा-कॅरोटीन, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी, फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन-ईचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. याकरिता दररोज एक टोमॅटोचा रस प्यावा.