त्वचा आणि केसांच्या निरोगी आरोग्याकरिता ‘या’ भाजीचा रस गुणकारी, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निरोगी त्वचा आणि केसांच्या वाढीकरिता पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. हिरव्यागार पानांच्या पालक भाजीमध्ये अनेक पोषक तत्त्वे असतात. यामुळे फक्त शरीराकरिताच नाही, तर केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्याकरिता आहारात पालकची भाजी किंवा ज्यूसचा समावेश करणे आवश्यक आहे. पालक भाजीचे सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकते. पालक पचण्याकरिता हलका आहे शिवाय कच्च्या पालकाचे ज्यूस प्यायल्याने जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमिनो अॅसिड भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.

त्वचेचे आरोग्य सुधारण्याकरिता दररोज एक ग्लास पालकाचा ज्यूस प्यावा. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. शिवाय या ज्यूसमुळे त्वचेवर असणारे काळे डाग, सुरकुत्या दूर होतात तसेच त्वचा हायड्रेट आणि मुलायम राहण्याकरिता आहारात पालकाच्या रसाचा समावेश करावा. पालकाचा रस प्यायल्याने त्वचेचा संसर्ग होण्याचा धोकाही टळतो.

केसांकरिता गुणकारी
– पालकाचा रस प्यायल्याने केसांच्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात.
– पालकाचा ज्यूस प्यायल्याने डोक्यात येणारी खाजेची समस्या कमी होते.
– पालकमध्ये जीवनसत्त्व बी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी पालकाच्या ज्यूसची मदत होते.
– केस चमकदार होण्याकरिता पालकाचा रस पिणे फायदेशीर ठरते.